भुसावळ – कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथे आज दि.
२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रवींद्र डांगे (अधीक्षक अभियंता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजेश अंबादास पवार (वित्त व लेखा व्यवस्थापक भु. औ. विद्युत केंद्र दिपनगर),
अनंत जाधव (केंद्र सचिव निर्मिती कंपनी वीज महासंघ दिपनगर),
प्रफुल्ल आवारे (गुणवंत कामगार- २०२१), शैलेंद्र सपकाळे (सेंट्रल बँक ऑफ इंडिया दिपनगर), मिलिंद कोल्हे सर (शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय दिपनगर),
सौ.बी.एस.बोरोले , सौ रुपाली राणे (शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय दिपनगर), यांची प्रमुख उपस्थितीती होती .यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले

सचिन भावसार अशोक पाटील, संजय तायडे, बाळासाहेब पाटील ,मिलिंद पाटील, अजय साळुंखे ,छगन पवार ,सुरेश भारुड , अश्विनी देशपांडे वर्षा तायडे, जयश्री भिरूड, तसेच इतर केंद्र सभासद कामगार बंधू भगिनी व शालेय विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
सूत्रसंचालन किशोरकुमार मनोहर पाटील (केंद्र संचालक का.क.केंद्र.दिपनगर) यांनी केले. तर आभार प्रदर्शन के.एम.पाटील ( केंद्र संचालक का.क.केंद्र दिपनगर) यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ललित माळी. सौ शारदा भावसार.यांनी परिश्रम घेतले.


