भुसावळ – येथील जय संताजी महिला मंडळातर्फे समस्त तेली समाजातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात व आनंदाने साजरा झाला यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजातील जेष्ठ महिला श्रीमती कुसुमबाई लक्ष्मण सोनवणे तर जय संताजी महिला मंडळ अध्यक्ष तथा माजी नगरसेविका सौ कविता चौधरी , उपाध्यक्ष सौ रेखा धुपे , सचिव उज्वला बागुल , कोषाध्यक्ष सौ भारती चौधरी , सल्लागार डॉ . वृषाली चौधरी , सहसचिव सौ प्रतिभा चौधरी या व्यासपीठावर उपस्थित होत्या .


प्रारंभी श्रीगणेश वंदना व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व जय संताजी महिला मंडळ नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष कविता चौधरी यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही देऊन मार्गदर्शन केले व महिलांनी समाजकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले . तर सचिव उज्वला बागुल यांनी जय संताजी महिला मंडळ स्थापना करण्याचा उद्देश व मंडळाचे उद्दिष्टे ध्येय धोरण याबाबत सविस्तर माहिती कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सांगितली. प्रसंगी सौ. रेखा धुपे व डॉ. वृषाली चौधरी यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले .
दरम्यान आयोजित स्पर्धामधून महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यात उखाणा स्पर्धेत प्रथम सौ कांताबाई चौधरी , द्वितीय रेखा चौधरी , तृतीय वैशाली चौधरी , तर उत्तेजनार्थ अनिता चौधरी यांनी बक्षीस मिळवले. तर श्री संत जगनाडे महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती आजच्या पिढीला सुद्धा व्हावी या उद्देशाने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनिता चौधरी , टीना पाटील , कविता पाटील , भारती चौधरी , अनिता चौधरी , पुष्पा चौधरी , सुनिता चौधरी , वैशाली चौधरी , वंदना पैठणकर यांनी बक्षीस मिळवले .

दरम्यान उपस्थित महिलांसाठी जय संताजी महिला मंडळातर्फे आयोजित लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली या लकी ड्रॉमध्ये दोन पारितोषिके काढण्यात आली. तन्वी विजय चौधरी , श्रेया चौधरी व कोमल चौधरी या लहान बालिकांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला . या लकी ड्रॉ मध्ये मालती सुधीर चौधरी व सुशीला गुलाब चौधरी या नशीबवान महिलाना साडी मिळाली .

तर संगीत खुर्ची मध्ये प्रथम- कविता पाटील द्वितीय- कीर्ती विलास चौधरी तृतीय-रूपाली हरीश चौधरी यांनी बक्षीस मिळवले सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ . प्रतिभा चौधरी , उज्वला बागुल , भारती चौधरी यांनी केले तर आभार सौ वैशाली चौधरी यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय संताजी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्या सौ.गायत्री विजय चौधरी, सौ.सुरेखा संजय चौधरी, सौ.वैशाली सुनिल चौधरी, सौ.उज्वला गोपाळ चौधरी , सौ.दिपाली योगेश चौधरी, सौ.सुनिता सुधाकर पाटील , सौ.पुष्पा सुरेश चौधरी, सौ.सविता गणेश सोनवणे , सौ.शितल गणेश चौधरी , सौ ज्योती दिलीप चौधरी , सौ.रंजना राकेश चौधरी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास शहर तेली समाज कार्यकारिणीचे विशेष सहकार्य लाभले .कार्यक्रमास महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .



