धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा , न्यायाधीश एम्.आर.बागडे यांचा न्याय निर्णय :

भुसावळ – धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला तीन महिने कारावास आणि धनादेशाच्या दुप्पट रक्कम नुकसान भरपाई चे आदेश. भुसावळ येथील तिसरे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम आर बागडे यांनी दिला निकाल. आरोपी वर चलनक्षम पत्रकाचा कायद्या अंतर्गत फिर्याद दाखल होती.

आरोपी राजू भिकन मिस्री यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को आप सोसायटी भुसावळ या संस्थेकडून 40,000/- चाळीस हजार मात्र चे कर्ज घेतले होते त्या कर्जाची परतफेड म्हणून आरोपी राजू मिस्री यांनी संस्थेला 30,000/- तिस हजार मात्र चा धनादेश दिला होता, सदर धनादेश अनादरित झाल्यावर संस्थेने आरोपीला नोटीस देऊन अनादरित धनादेशाच्या रकमेची मागणी केली परंतु आरोपीने मुदतीत रक्कम दिली नाही, संस्थेने आरोपी विरुद्ध चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम 138 प्रमाणे फौजदारी खटला दाखल करुन कोर्टाकडे दाद मागितली या खटल्याची सुनावणी तिसरे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम.आर.बागडे यांचे समक्ष पुर्ण झाली. फिर्यादी तर्फे साक्षीदार अविनाश मनोहर काळे यांनी फिर्याद दिली संस्थेतर्फे वकील म्हणून ॲड .निलेश सुरेश भंडारी यांनी काम पाहिले. उपलब्ध साक्षीपुराव्यांच्या आधारे कोर्टाने आरोपी राजू भिकन मिस्री यास दोषी ठरवले आणि धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजे 60,000/- साठ हजार मात्र नुकसान भरपाई म्हणून फिर्यादि ला देण्याचे आदेश केले, तसेच नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास तिन महिने साधी कैदचे आदेश पारित करण्यात आले. सदर निकाल न्यायाधीश एम.आर.बागडे यांनी खुल्या कोर्टात उभय पक्षाच्या व वकीलांच्या उपस्थित दिला.