भुसावळ – प्रतिनिधी – येथील ब्राह्मण संघात दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन ब्राह्मण संघातर्फे करण्यात आले आहे.

सामूहिक व्रतबंध सोहळ्याच्या कार्यक्रम 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत होणार असून यावेळी व्रतबंधाचे सर्व धार्मिक विधि पूर्ण केले जातील. तरी ज्या समाजबांधवाना व्रतबंध सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी दि. 28 जानेवारी 2025 पर्यंत व्रतबंध नावनोंदणीसाठी ब्राह्मण संघ कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ यांनी केले आहे.


