भुसावळ (प्रतिनिधी –
भुसावळात मुंबई ते झारखंड टॅक्सीने जाणाऱ्या प्रवाश्यांना राष्ट्रीय महामार्ग 6 वर पोलिसांनी अडवीले होते या सर्वांची तपासणी जागेवरच करण्यात आली .प्रसंगी यासर्वानी सकाळ पासून काहीही खाल्ले नव्हते यामुळे शिवसेनेचे शहर संघटक तथा संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश बागुल या शिवसैनिकाने सर्वाना जेवण दिले .
यावेळी उपाध्यक्षा सौ गीता जगन्नाथ बागुल यांनी या शेकडो लोकांकरीता स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडली.यावेळी
प्रतिष्ठान सदस्य , तनवीर तडवी, गणू पांडे, मोहित गायकवाड़,आदींनी सहकार्य केले .
होय हिन्दुच , या गृपतर्फे गरीबाना अन्नदान
भुसावळ (प्रतिनिधी )-
होय हिंदुच या गृप तर्फे रविवारी येथील भील वाडी गजानन मंदिर मारुति नगर आंबेडकर नगर , या भागातील गोरगरीबांना जेवन देण्यात आले .
यावेळी अभिजीत मराठे , विनोद बुला, समीर शेख, मोनी ठाकुर, मनोज सोनवणे, वाल्मीक कोतुरवार, राकेश नाटकर, योगेश बागुल, उमेश जाधव, नीलेश सावळे, मोहित गायकवाड़ , तनवीर तडवी ,आदींनी सहकार्य केले .



