भुसावळातील भाजपाच्या नगरसेवकांनी स्व-खर्चाने केली प्रभागात फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे येथील प्रभाग 6 चे नगरसेवक प्रमोद नेमाडे व प्रीतमा गिरीश महाजन यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागातील नागरीकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली
प्रभागातील सर्व रस्ते, घरांच्या कम्पाऊंड वॉल, तसेच गेट सॅनिटाईज करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रभाग क्रमांक सहामधील भोळे कॉलनी, शारदा नगर, शांतीनगर, सहकार नगर, गजानन महाराज नगर, भालोदकर प्लॉट, गुरुद्वारा, प्रभात कॉलनी, पवन नगर, भालचंद्र नगर, बल्लाळेश्वर कॉलनी भागात फवारणी करण्यात आली. प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, आरोग्याधिकारी निवृत्ती पाटील, प्रभागाचे नगरसेवक प्रमोद नेमाडे, नगरसेविका प्रीतमा महाजन, गिरीश महाजन आदीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *