हातावर काम असणाऱ्यांसाठी नगरसेवक बबलू माळी यांचा पुढाकार ; 300 कुटुंबांना वाटप करणार अन्नधान्य

वरणगाव (प्रतिनिधी)-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉक डाऊन केल्‍यानंतर बरेचसे कुटुंब रोज कमावतील तर जेवायला मिळेल अशी परिस्थिती आहे त्यांच्यासाठी नगरसेवक बबलू माळी यांनी पुढाकार घेऊन साहित्य वाटप करण्यासाठी पॅकेट्स तयार करताना चे फोटो व्हाट्सअप ग्रुप वर टाकले असता त्यांना प्रचंड मदतीचा ओघ सुरू झाला असून दररोज 300 कुटुंबांना मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
शहरात काही कुटुंबे असे आहेत की रोज कमवणे व रोज खाणे असा चरितार्थ चालतो मात्र लॉक डाउन मुळे त्यांना काम मिळत नसल्याने रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी नगरसेवक बबलू माळी यांनी पुढाकार घेऊन एका कुटुंबासाठी एक किलो साखर, एक किलो तांदूळ, एक किलो तेल, पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक पाव मिरची पावडर, एक मिठाची पुडी, 1 पाव चहा पावडर असे पाकीट तयार करून गरजवंत तीनशे कुटुंबाला पोहोचवणार आहेत हे पाकीट तयार करतानाचे फोटो व्हाट्सअप ग्रुप वर टाकले असता त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे दुबईमधील अविनाश झांबरे यांनी तात्काळ दहा हजारांची रोख मदत पाठवली आहे तर शहरातून देखील प्रतिसाद मिळत असल्याने हा उपक्रम असाच सुरू राहील असे त्यांनी सांगितले यासाठी त्यांना नगरसेवक रविंद्र सोनवणे, गोगा शेठ, बशीर कुरेशी, साजिद कुरेशी, गुफरान भाई, पप्पू जकातदार, अब्दुल्ला खाटीक, निसार अली, इरफान शेख यांची मदत झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *