मध्य प्रदेशात अडकलेले भावीक भुसावळात दाखल ; पालिका रुग्णालयात ४७ यात्रेकरुंची तपासणी ; होम कॉरनटाइनचे आदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी)
जिल्हयासह शहरातील विविध भागांमधून उत्तर प्रदेशमध्ये यात्रेसाठी गेलेल्यां ४७ जणांची रावेर मतदार संघाचे खासदार रक्षा खडसे व भुसावळाचे आमदार संजय सावकरें यांनी केलेल्या प्रयत्नांनी व जिल्ह्यधिकारी यांच्यावतीने भुसावळ तालुक्यात आणण्यात आले . दरम्यान आणल्यां नंतर येथील संत गाडगे महाराज नगरपालिका दवाखान्यात सकाळी ९ वाजेला या सर्वांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली . तपासणीत सर्व
४७ यात्रेकरुंना होम कॉरनटाइनचे आदेश देण्यात आले असून घरी बसून नियमांचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या व घरी पाठविण्यात आले .
संचारबंदी सुरू होण्याच्या आधी भुसावळ,मुक्ताईनगर, शिरपूर तालुक्यातील ४७ जण काशी व बनारस गावी यात्रेसाठी गेले असता २३ मार्च रोजी सरकारने संचारबंदीचे आदेश लागू केल्याने यात्रेसाठीे उत्तर प्रदेशात अडकल्याने त्यांचे हाल झाले.यात्रेकरू हळूहळू मध्यप्रदेशा पर्यत पोहचल्यानंतर रावेर मतदार संघाचे खासदार रक्षा खडसे व भुसावळाचे आमदार संजय सावकरेंचा प्रयत्नांनी तसेच मध्यप्रदेशचे जिल्ह्यधिकारी यांचेशी चर्चा करून दिनांक २७ मार्च रोजी भुसावळात येण्याची परवानगी मिळवली त्यानुसार या ४७ यात्रेकरूना लॅक्सरी ने संत गाडगे महाराज नगरपालिका दवाखान्यात आणले त्यांची कोरोना व्हायरसची तपासणी केली.यामध्ये सर्व यात्रेकरुंची तपासणी करण्यात आली . सर्व व्यवस्थित असून कोणालाही अद्याप पावेतो कोणताही त्रास झालेला नाही व होत नसल्याने या सर्व ४७ यात्रेकरुंना होम कॉरनटाइनचे आदेश देण्यात येवून घरी बसून नियमांचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी ड़ॉ कीर्ति फलटनकर यांनी दिली .
दरम्यान अनंत अडचनीना सामोरे जात ही मंडळी अखेर भुसावळ येथे पोहचली त्यांना नगरसेवक युवराज लोणारी यांचे मार्गदर्शनाखाली चहा , बिस्किट्स, नाष्टा यासह जेवण देण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *