देवदूत म्हणून पावले; शेकडो गरीब नागरिकांचे घरी पोहचवले जेवण ; नगरसेवक महेन्द्रसिंग ठाकुर यांचे कौतुकास्पद कार्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण शहर कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी संचारबंदीत नियमांचे काटेकोर पालन करीत आहे . या संचारबंदीमुळे आपल्या २० क्रमांक असलेल्या प्रभागात असलेले शेकडो गोरगरीब हातमजूर नागरिकांना काम नाही त्यामुळे त्यांचे घरात चूल सुद्धा पेटत नाही यासाठी आजसकाळी गुरुवार रोजी कोबी बटाटा भाजी व दीड क्विंटल गव्हाच्या पोळ्या बनवून स्वत: नगरसेवक महेन्द्रसिंग ठाकुर उर्फ पिंटू यांनी प्रत्येक नागरिकांच्या घरी घरपोहच जेवण दिले . ठाकुर यांनी त्यांच्या प्रभागातील कोणीही उपाशी राहु दिले नाही व देत नाही त्यांनी जेवण देवून गरीबांची भूख भागवली. यावेळी आज डी एन मंडळं, शिवाजी गृप , जन्मभूमी मंडळ, नवयुग मंडळ , सुवर्णं मंडळ यांचे सहकार्य लाभले . भुसावळ शहरातील या जनसेवकास सर्वानी भरभरुन आशीर्वाद दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *