कोरोना विशाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रभाग १३ मध्ये केली रोग प्रतिबंधक फवारणी ; नगरसेवकांचे नागरिकांनी केले कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता येथील सरस्वती नगर ,फालक नगर, यासह प्रभाग क्रमांक १३ मधील परिसरात घरोघरी सॅनेटाइज निरजंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली असून संपूर्ण परिसरात ही फवारणी होणार असल्याचे नगरसेवक राजेन्द्र आवटे व मुकेश गुंजाळ यांनी कळविले आहे . संचारबंदी मध्ये पोलीस प्रशासनावेळेचे बंधन असल्या कारणाने ही फवारणी सकाळी ७ ते १० पर्यंत शक्य तितक्या परिसरात केली जाईल .गांधी नगर , गडकरी नगर , बजरंग कॉलनी , गोपाळ नगर , गुंजाळ कॉलनी, पाण्याची टाकी , रिंगरोड प्रलहाद नगर, वैष्णव माता नगर, गुजर कॉलनी ,शिवदत्त नगर जलालशहाबाबा दर्गा परिसर, चाहेल पंजाब धाब्या , मागील व बगीचा हॉटेल मागील परिसरात फवारणी टप्या टप्याने करण्यात येणार आहे . कृपया चुकून कुठला परिसर वा घर सुटल्यास आमच्याशी संपर्क करा आम्हाला सुचवा असे आवाहन नगरसेवक राजेंद्र दत्तूआवटे( 9545303333) व मुकेश गणपत गुंजाळ ( 9823199179 )यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *