भुसावळ – भुसावळात आमदार संजय सावकारे यांच्या विजयाने ” लाडक्या बहिणींचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला . लाडक्या बहिणींनी गुलालाची उधळणकरीत वाद्याच्या तालावर ठेका धरून विजयाचा चौकार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला यावेळी आमदार संजय सावकारे यांच्या सुविद्य पत्नी सौ रजनी संजय सावकारे यांच्यासह भाजपच्या नगरसेविका पदाधिकारी , यांचेसह महिला कार्यकर्त्यानी एकमेकींना शुभेच्छा दिल्या
महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांना पहिल्या फेरीतच तीन हजार 789 मतांचा लीड मिळाला तर दुसर्या फेरीतही त्यांनी आघाडी घेतली सात हजार 964 मतांचा लीड घेवून त्यांनी विजयाची घौडदोड सुरू केली ही घोड दौड वेगाने सुरूच होती सावकारेंचा विजय निश्चित असल्याने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चाहते , मित्रपरिवार यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली . या जल्लोषात लाडक्या बहिणींनी सुद्धा मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन फुलांची व गुलालाची उधळण करीत ढोल ताश्यांच्या तालावर सर्व महिलांनी ठेका धरला व मनसोक्त आनंद व्यक्त केला . तर आमदार सावकारे यांनीही बहिणी सोबत ठेका धरून आनंदात सहभागी झाले .


निवडणुकी दरम्यान महायुतीचे उमेदवार भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराची धुरा आमदार संजय सावकारे यांच्या सुविद्य पत्नी सौ रजनी ताई सावकरे यांनी सांभाळली . रजनी ताई यांची ही महिला सेना अर्थात सर्व महिला पदाधिकारी व लाडक्या बहिणी यांच्या साठी नेहमीच अनेक कार्यक्रम घेत असतात महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्या अधिकाधिक सक्षम व्हाव्या शिक्षणात प्रगती करून उंच यशाचे शिखर गाठावे यासाठी आ सावकारे व रजनी ताई कायम पुढाकार घेत असतात . याचीही फलश्रुती म्हणून शहरासह तालुक्यातील महिला भगिनी यां8 प्रचंड प्रमाणात आपल्या लाडक्या भावाला मतदान केले रजनी ताई यांची भूमिका सुद्धा अतिशय महत्वपूर्ण “किंग मेकर ” अशी ठरली . यामुळे आजच्या विजया नंतर महिलांनीही आपला आनंद गुलालाची उधळण करीत फटाके फोडून पेढे भरवून वाद्याचे तालावर नृत्य केल्याने दिसून आला शहरात आज मतमोजणी स्थळा पासून घरापर्यंत रस्त्याने ठिकठिकाणी आ संजय सावकरे यांचे औक्षण करून पूष्पहार घालून औक्षण करून अभिनंदन केले . यावेळी भाजप शहराध्यक्ष अनिता आंबेकर , संगीता बियाणी , सोनल महाजन , ज्योती रुदानी, यांचेसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या .






