ज्येष्ठांनी नव्या पिढीशी जुळवून घ्यावे व तरुणांनी अहंकाराला आळा घालावा – डी. टी. चौधरी यांचे आवाहन ;

भुसावळ – आरोग्य विषयक सुविधांमुळे आपले आयुर्मान वाढले जाते या वाढलेल्या आयुष्यात आपणास आनंदाने तसेच जगता येईल यावर भर द्यावा जेष्ठांनी नवीन पिढी सोबत जुळवून घ्यावे तर तारुण्यात असलेल्यांनी अहंकाराला आळा घालावा जेणेकरून कौटुंबिक वाद विवाद टळतील असे महाराष्ट्र फेस्कॉम चे माजी अध्यक्ष डी टी चौधरी यांनी सांगितले . नाहाटा महाविद्यालयात श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक मंडळ विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता व सवलती या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी ज्येष्ठांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना कायद्यांची जाणीव करून देत .आनंदी वृद्धत्व या विषयावरत ते बोलत होते

कार्यक्रमास प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ. सोपान इंगळे हे उद्घाटक तर फेस्कॉम महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डीटी चौधरी अध्यक्ष होते यावेळी एडवोकेट संजय जोशी एडवोकेट जास्वंदी भंडारी , खानदेश प्रादेशिक विभागाचे माजी अध्यक्ष जगतराव पाटील जळगाव तालुका समन्वयक विठ्ठल बारी जामनेर समन्वयक भागवत पाटील प्रमुख पाहुणे होते

सरस्वती पूजन दत्त पूजन व दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली नंतर विजय चौधरी यांनी फेस्कॉम गीत सादर केले श्री गुरुदेव जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव महादेव हरीमकर यांनी प्रास्ताविक केले यानंतर प्रभावी कुलगुरू प्राध्यापक डॉ. सोपान इंगळे यांनी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली या कार्यशाळेला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान शिक्षण मंत्रालयाकडून अनुदान दिले जाते अशी माहिती देखील देण्यात आली

दरम्यान जगतराव पाटील यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांची स्थिती याबद्दल विवेचन केले तर एडवोकेट संजय जोशी यांनी जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने २००७ मध्ये व महाराष्ट्र शासनाने २००० मध्ये अधिनियम लागू केल्याचे सांगितले

यावेळी भारत सरकारकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती दिल्या जातात त्यांचा ज्येष्ठांनी लाभ घेऊन वृद्धत्व सुकर करावे अडचणीत प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन एडवोकेट जास्वंदी भंडारी यांनी केले

तसेच श्री गुरुदेव जेष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते यांनी मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली डीवायएसपी जेष्ठ नागरिक संघाची दर महिन्याला सभा घेऊन जेष्ठांच्या समस्या सोडवतात असे सांगितले कार्यशाळेला कुर्हे पानाचे खंडाळा व भूसावळ शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद उपस्थित होते. प्रसंगी श्री गुरुदेव जेष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते यांनी मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली डीवायएसपी जेष्ठ नागरिक संघाची दर महिन्याला सभा घेऊन जेष्ठांच्या समस्या सोडवतात असेही सांगितले