भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवार रोजी झालेल्या मतदानात भुसावळ शहर व तालुक्याचे एकूण मतदान ५७.६३ टक्के झाले दोन बूथवर बोगस मतदान झाल्याची व शहरातील किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत व शांततेत पार पडले . यंदा प्रशासनाने केलेलया जनजागृतीचा सर्वत्र चांगलाच परिणाम दिसून आला गुलाबी थंडीत सकाळी मतदांना करिता नागरिक उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघाले . निवडणुकी पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तगडी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती . सकाळी सात वाजेपासून मतदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या आणि मतदारांमध्ये वेगळा उत्साह दिसून आला सेल्फी पॉईंट, पिंक बूथ , तरुणांना करीता यासह मतदान करण्यासाठी काही ठिकाणी रॅली काढण्यात आल्या .

भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी दि २० नोव्हेंबर रोजीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व परिसरात मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर मतदानासाठी तयारी पूर्ण करण्यात आली होती लोकसभा निवडणूकीसाठी भुसावळ विधानसभा क्षेत्रात तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सायंकाळ पर्यंत …. टक्के मतदान झाले. बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी होती. सकाळी ११ वाजेपर्तंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली होती. सायंकाळी पुन्हा गर्दी कायम होती.
प्रांतअधिकारी कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाचे कर्मचारी यांनी काम पाहिले. मतदानासाठी शहरातील खडकारोड, शिवाजीनगर, जाम मोहल्ला भागात मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.यात प्रामुख्याने महिलांची संख्या अधिक दिसून आली.
57 . 63 टक्के मतदान-
दरम्यान सकाळी ७ ते ९ वाजता ५.९५टक्के ११ वाजता १६.३७ टक्के, दुपारी १ वाजता २८.३१ तर दुपारी ३ वाजता ३९.९३ टक्के, पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के , व रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदानाची एकूण ५७.६३ टक्के नोंद करण्यात आली . विधानसभा मतदार संघात साधारणत ५७.६३ टक्के मतदान झाले.
सकाळ पासूनच मतदान केंद्रांवर रांगा दिसून येत होत्या. मात्र मतदान कमी झाले दुपारी १२ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. मात्र दुपार नंतर रांगा लागल्या होत्या तसेच ग्रामीण भागात दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.दिव्यांग मतदारांकरिता रॅम्प सह विविध स्वयंसेवक व प्रशासनाने उत्तम सोय केली तर भुसावळात प क कोटेच्या महाविद्यालयात सखी पिंक मतदान केंद्र सर्वांकरिता आकर्षण ठरले . मतदानकेंद्रच्या बाहेर सावलीकरिता मंडप व पाण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह अंगणवाडी महिला कर्मचारी बाळांना सांभाळण्या करिता उपस्थित होत्या .
उत्स्फूर्त प्रतिसाद-
या निवडणूकीत प्रचार तोफा पाहिजे तशा धडाडल्या नसल्यातरी मतदारांमध्ये झालेल्या जनजागृती मुळे सर्वच स्थरातून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान प्रशासनातर्फे सर्व कर्मचा-यांना नाष्टा जेवण, गार पाणी , आदींची उत्तम व्यवस्था सहाय्य्क निडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती . भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ , उद्धव डमाळे, महेश गायकवाड , वाहतूक पोलीस सपोनि महेश महाले यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला .
भुसावळ विधानसभा मतदार संघात डॉ राजेश मानवतकर , जगन सोनवणे , संजय सावकारे , स्वाती जगलें बाविस्कर , या उमेदवारांचे निवडणुकीतील राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सिलबंद झाले.
.निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या अॅपमध्ये देखील मतदारांची नावे सापडत नसल्याने मतदारांना वेगवेगळ्या मतदान वेंâद्रावर फेऱ्या-या माराव्या लागल्यामूळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बाजारपेठेत शुकशुकाट
भुसावळ शहरातील बाजारपेठ आज बुधवार असून देखील मोठ्या प्रमाणावर दुकाने बंद होती नागरीकांनीही दुपारी घराबाहेर निघणे टाळल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शुकशुकाट दिसून आला.यामध्ये सराफ बाजार,कापड दुकाने,फर्निचर,शो-रुम यांचेसह इतर व्यावसायीकांचाही समावेश होता.तर सांयकाळी काहीशा प्रमाणात बाजारपेठेत वर्दळ दिसून आली.
बसेस अभावी प्रवाशांचे हाल
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर भुसावळ विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील मतदान वेंâद्रावर मतदान यंत्रे पोहचवणे व आणण्यासाठी निवडणुक आयोगाच्या माध्यमातून भुसावळ आगारातील १९ बसेस आरक्षीत करण्यात आल्या होत्या.परीणामी आगाराला ग्रामीण भागातील काही बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या
पोलीसांचा चोख बंदोबस्त
शहर व ग्रामीण भागातील मतदान वेंâद्रावर कुठल्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते.यामध्ये सीआरपीफ,आरसीपी प्लाटून ,यासह स्थानिक पोलीस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त लावला होता.तसेच सहायक जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी मतदान वेंâद्रासह ग्रामीण भागातील मतदान वेंâद्रावर प्रत्यक्ष जावून बंदोबस्ताचा आढावा घेतला.व बंदोबस्तावरील पोलीस अधिका-यांना आवश्यक सुचना दिल्या.
उमेदवारांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क
भुसावळ येथील मतदार वेंâद्रावर आ.संजय सावकारे ,रजनी सावकारे ,डॉ राजेश मानवतकर डॉ मधु मानवतकर, स्वाती बाविस्कर /जंगले , कुणाल जंगले , जगन सोनवणे यांचेसह सर्व नगरसेवक , पदाधिकारी व सेवाभावी संस्थाच्या पदाधिका-यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
भुसावळ दोन बूथ वर बोगस मतदानाच्या तक्रारी
दरम्यान भुसावळ विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिये दरम्यान शहरातील बूथ क्रमांक 34 कोटेचा महाविद्यालय येथे व अन्य एका बूथवर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या .सदर तक्रारी त्वरित सोडवण्यात आल्या . सिव्हिजन अँपच्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात पाच तक्रारी आल्या होत्या त्यांची दखल घेत त्या तत्काळ निकाली काढण्यात आल्या कोटेच्या महाविद्यालय आणि अन्य बुथवर झालेला तक्रारीत संबंधितांना समजावून तात्काळ वाद मिटवण्यात आला


