भुसावळ – भारतीय जनता पार्टी महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष उपस्थितीत शहरातून सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भव्य महारॅली काढण्यात आली.


जामनेर रोडवरील दर्डा भवनापासून प्रचार रॅलीला सुरूवात झाल्यानंतर रस्त्यात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करीत आमदारांना मतदारांनी आशीर्वाद दिले. दरम्यान, यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी मनोगतात आमदार संजय सावकारे पुनश्च प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा केला.
अग्रभागी भजनी मंडळ, ढोल-ताशांचा गजर व भारतीय जनता पार्टी व आमदार संजय सावकारे यांच्या जयघोषात मतदार अभिवादन रॅलीला मोठ्या जल्लोषात सुरूवात झाली. अष्टभूजा देवी, ब्राह्मण संघ, डिस्को टॉवर, मरीमाता मंदिर, लक्ष्मी चौक, गांधी चौकी, अमर स्टोअर्स, लोखंडी पूल, वसंत टॉकीजमार्गे, तु.स.झोपे शाळा, जळगाव रोड, सरदार वल्लभभाई पुतळ्याजवळ रॅली आल्यानंतर तिचा समारोप झाला.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, चंद्रशेखर अत्तरदे, सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, राजेंद्र आवटे, महेंद्रसिंह (पिंटू) ठाकूर, प्रमोद नेमाडे, रवी ढगे, निकी बत्रा, अजय नागराणी, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक मुकेश पाटील, किरण कोलते, दिनेश नेमाडे, देवा वाणी, भैय्या महाजन (खडका), भैय्या चुडामण भोळे, अनिल वारके, भुसावळ शेतकी संघ सभापती ज्ञानदेव झोपे, नितीन धांडे, गौरव आवटे, भैय्या महाजन (खेडी), प्रकाश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, रजनी संजय सावकारे, डॉ.संगीता बियाणी यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


