भुसावळातील जाम मोहल्ला परिसरात आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत -फटाक्यांची आतषबाजी अन फुलांच्या पाकळ्यांची सर्वत्र उधळण

भुसावळ : भुसावळ विधानसभेतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी सायंकाळी शहरातील खडका रोड भागात प्रचार रॅली काढली. अत्यंत जल्लोषात व उत्स्फूर्तपणे आमदार सावकारे यांचे स्वागत करण्यात आले तर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून व फुलांची उधळण करून आमदारांना आशीर्वाद देण्यात आले.
भुसावळ शहरातील खडका चौफुलीजवळील मन्नत बिल्डींगपासून प्रचार रॅलीला शनिवारी सायंकाळी सुरूवात झाली. यावेळी मुन्ना तेली यांच्या घराजवळ तसेच अन्य सहा ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. या परिसरातील रजा चौक, अमरदीप चौक, जलील कुरेशी यांच्या घराजवळून तसेच आगाखान वाडा भागातून प्रचार रॅली काढण्यात आली.
प्रचार रॅलीत उद्योजक मनोज बियाणी, शरीफ ठेकेदार, हुसनोद्दीन पेंटर, माजी नगराध्यक्ष नईम पहेलवान व हाजी मुन्ना तेली, माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, माजी नगरसेवक मुस्ताक शेख, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, संतोष (दाढी) चौधरी यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील मुस्लीम बहुल भागात काही समस्या असतील तर त्या पालिका प्रशासनाला सांगून निश्चितपणे सोडवण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी आमदारांनी दिली. शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अमृत योजना मंजूर असून त्याचे काम सुरू असून खडका रोड भागात रस्त्यांची कामे मंजूर झाल्याचेही आमदारांनी सांगितले.