भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना अ.भा.सफाई कामगार संघटनेचा पाठिंबा – आमदारांनी समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे आमदार संजय सावकारे यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. शनिवार, 16 रोजी पदाधिकार्‍यांनी आमदार संजय सावकारे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना निर्विवाद आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले.
सफाई कर्मचार्‍यांची नवीन पद भरती व्हावी तसेच समाजाच्या अडी-अडचणी सोडवाव्यात, अशी अपेक्षा शिष्ट मंडळाने आमदारांकडे केल्यानंतर आमदारांनी निश्चितपणे समस्या सोडवण्यात येतील, अशी ग्वाही शिष्ट मंडळाला दिली.
प्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह उद्योजक मनोज बियाणी, रमाशंकर दुबे, अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे शहराध्यक्ष मयूर भारती अशोक सुरवाडे, यशवंत बोरीकर, गौरव नन्नवरे, निलेश बारसे, दुर्गेश उज्जैनवाल, लखन शवरे आदींची पाठिंबा पत्रावर नावे आहेततर महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष थामेत यांच्या स्वाक्षरीचे पत्र आमदारांना यावेळी देण्यात आले.