भुसावळ – मध्य रेल महिला कल्याण संघटनेतर्फे भुसावळ रेल्वे शाळेत दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी बालदिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडल रेल्वे प्रबंधक श्रीमती इति पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

बालदिनाच्या या कार्यक्रमात शालेय मुलांसाठी सांस्कृतिक व कल्याण साधक अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी मंडल रेल्वे प्रबंधक यांनी मुलांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना खाऊ व बक्षिस वितरण केले.
यावेळी , मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक आरोग्य तपासणी शिबीरही आयोजित करण्यात आले. या शिबिरात मुलांचा संपूर्ण आरोग्य तपासणी आणि त्यांना आवश्यक आरोग्य संबंधित सल्ला देण्यात आला. मेडिकल टीमने मुलांचे वजन, उंची आणि शारीरिक स्वास्थ्याची तपासणी केली, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यात आली.
मंडल रेल्वे प्रबंधक यांनी या प्रसंगी सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या आणि मुलांच्या उज्जवल भविष्याच्या शुभेच्छांसह मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मध्य रेल महिला कल्याण संघटनेच्या सदस्यांसह, रेल्वे शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक यांचाही सक्रिय सहभाग होता.



