भुसावळात श्री गुरुनानक जयंती निमित्त भव्य शोभायात्रा ; समाज बांधवांचा सहभाग ; चित्तथरारक कसरतींनी वेधले लक्ष

;भुसावळ – गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार रोजी सायंकाळी शहरात शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शीख बांधवांनी तलवारबाजी , पेटलेले गोळे फिरवूनआगीचे रिंगण असे सादर केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिके मिरवणुकीचे आकर्षण ठरले . दरम्यान गुरुनानक जयंती पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून जळगाव रोडवरील गुरुद्वारा मध्ये श्री अखंड पाठ प्रभात फेरी असे उपक्रम सुरू आहे गुरुवारी दुपारी अडीच वाजता गुरुद्वारातून शोभायात्रेस सुरुवात झाली गरुड प्लॉट भागातून हबर्डीकर चौक पांडुरंग टॉकीज जामनेर रोड खालसा सायकल अप्सरा चौक सराफ बाजार या मार्गे बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरून हंबर्डीकर चौक गांधी पुतळा तहसील कार्यालयाकडून पुन्हा गुरुद्वारा जवळ येऊन शोभायात्रेचा समारोप झाला शोभायात्रेत झालेली गर्दी पाहता वाहतूक शाखेने ठिकठिकाणी रहदारी सुरळीत केली

व्यवस्थापन समितीचे नियोजन गुरुद्वारात १३ नोव्हेंबर पासून लंगर सुरू असून भाविकांना शुक्रवारी सुद्धा त्याचा लाभ मिळेल . लंगरची वेळ दुपारी 12 ते 2 व रात्री आठ ते दहा अशी आहे दररोज सुमारे 1000 भावीक प्रसादाचा लाभ घेत असून ही संख्या शुक्रवारी वाढू शकते त्यामुळे व्यवस्थापन समितीने नियोजन केले आहे भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीने केले आहे जयंती निमित्त गुरुवारी दुपारी 11 ते दोन या वेळेत कीर्तन झाले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष गुरु प्रीतम सिंग बल ,सचिव सुरेंद्र पाल , सिंग छाबडा , खजिनदार गुरुजीतसिंग पदंम , सदस्य गुरुजीत छाबडा, जगजीत सिंग छाबडा , रणजित सिंग गुजराल , कमलजीत सिंग गुजराल, सुरजितसिंग गुजराल आदीं परिश्रम घेत आहेत .