भुसावळ – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ब्राह्मण ज्ञातीची एकमेव गौरवशाली इतिहास असलेली संस्था – ब्राह्मण संघाच्या २०२४ – २०२९ या कालावधीच्या नुतन कार्यकारी मंडळाची निवडणूक दिनांक १० नोव्हेंबर रविवार रोजी मैत्रीपूर्ण लढतीमधे संपन्न झाली. यामधे २१ संख्या असलेल्या कार्यकारी मंडळा साठी सावरकर पॅनल व युवा आघाडी पॅनल असे दोन पॅनल समाज बांधवांच्या मतदानाचा जोगवा मागण्यासाठी निवडणुकीत उभे होते अंत्यत मैत्रीपूर्ण लढतीमधे सावरकर पॅनलने २० विरूद्ध १ असा विजय संपादन केला


यात सावरकर पॅनलचे अध्यक्ष म्हणून गणेश हरिभाऊ वढवेकर , उपाध्यक्ष गजानन जोशी सचिव . महेंद्र गोडबोले, युवा आघाडी पॕनलचेसह सचिव – सुनील पाठक आणि बाकी सर्व सावरकर पॕनलचे कोषाध्यक्ष अमोद टेंभुर्णीकर अंतर्गत हिशेब तपासनीस भालचंद्र जोशी कार्यकारी सदस्य – डॉ रमेश जोशी प्रसन्न गंधे, विजय घैसास विवेक कुळकर्णी , विजय जोशी , तुषार कुळकर्णी , अतुल जोशी , जयंत जोशी , संजय बोचरे , दिनेश जोशी, मनोज कुळकर्णी , हेमंत भोकरडोळे , श्रीमती कल्पना दामले, सौ वैशाली एकलारकर, सौ राजश्री पाठक असे २१ सदस्यीय कार्यकारी मंडळ पाच वर्षांसाठी निवडले गेले.
निवडणूक प्रक्रिया श्री लोहार यांच्या निरक्षणाखाली व मुख्य निवडणुक अधिकारी मधुकर गोडबोले, प्रकाश पेटारे, अनिल हिंगवे, अड संजय जोशी, रामभाऊ गचके, हर्षद बोरवणकर, बी. एम. कुळकर्णी, केंद्राध्यक्ष प्रसाद खरे, आशुतोष अडावदकर, अनिल जोशी, विलास जोशी व अशोक पाटील यांच्या निरपेक्ष भुमीकेतून अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात आर्दश लोकशाही प्रणाली नुसार निवडणुका शांततेत संपन्न झाल्या निकाल शहरातील जेष्ठ मान्यवर दिलीप ओक यांनी जाहीर केला. सदर निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण भुसावळ शहरातील मंडळींना लागुन होती हे विशेष .


