भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली द्वितीय प्रशिक्षण सत्र व प्रात्यक्षिक आज दिनांक 11/11/2024 रोजी पार पडले. भुसावळ विधानसभा मतदार संघाकरिता निवडणुक कामी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे 2 सत्रात प्रशिक्षण आयोजित केलेले होते. प्रथम सत्र प्रशिक्षण १२ ते २ वाजेपर्यंत भुसावळ शहरातील आदित्य लॉन वांजोळा रोड तर दुसरे प्रशिक्षण सत्र ३ ते ५ वाजेपर्यंत (ई. व्ही.एम. हाताळणी)ताप्ती पब्लिक स्कूल,जामनेर रोड भुसावळ येथे पार पडले .प्रशिक्षणार्थी मध्ये एकूण 1412 प्रशिक्षणार्थी पैकी 1383 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तर 29प्रशिक्षणार्थी अनुपस्थित होते .

यावेळी तहसीलदार नीता लबडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
तसेच निवडणूक कामी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे 2024 सार्वत्रिक विधानसभा करीता टपाली मतदान ताप्ती पब्लिक स्कूल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत टपाली मतदान झाले
निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील आणि तहसीलदार नीता लबडे व निवडणूक नायब तहसीलदार डॉ. अंगद आसटकर उपस्थित होते .


