रागाने घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची हृदय हेलावणारी घटना ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावतीतून समोर आली आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना घडली आहे. 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराने अमरावती शहर हादरलं आहे. पाच आरोपींना अटक झाली आहे. चारचाकी गाडीत बसून युवकांनी मद्यप्राशन केलं. त्यानंतर तरुणीवर बलात्कार केला. सर्व आरोपी अमरावती शहरातील आहेत. या आरोपींनी अटक देखील झाली आहे.

अमरावतीतील विलासनगर भागात ही पीडित तरूणी राहाते. तिचं घरात भांडण झालं. त्यामुळे रागाच्या भरात ही तरूणी घराबाहेर पडली. रस्त्याने जात असताना तिच्या ओळखीच्या तरूणाने तिला त्याच्या गाडीवर बसवलं. तिचा राग शांत करण्यासाठी तिला रहदारी नसणाऱ्या भागात त्या तरूणीला नेलं. तिथं तिला दारू पाजली. या तरूणीला कारमध्ये बसवलं आणि त्याच्या इतर चार मित्रांना तिथं बोलावलं. मग तिला शेतात नेलं आणि आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला.
पीडित तरूणीच्या तक्रारीनंतर बलात्कार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी या आरोपींचा शोध घेतला. या पाच आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे. तसंच या आरोपींकडून दुचाकी वाहन आणि कार देखील जप्त करण्यात आली आहे. मनोज डोंगरे (वय 29), अक्षय सरदार (वय 29), अजय लोखंडे (वय 28), मिलिंद दहाट (वय 30), प्रीतम धडसे (वय 19) या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


