भुसावळ – अखील भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणीत बहीणाई ब्रीगेडच्यावतीने अखंड भारताचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४९ जयंती अत्यंत उत्साहात व आनंदाने साजरी करण्यात आली .

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रासाठी व अखंडतेसाठी दिलेल्या योगदानामुळे आज भारतीय लोकशाही टिकून असल्याचे बहिणाई ब्रिगेड च्या जिल्हा अध्यक्ष सौ स्वाती भोळे यांनी सांगून त्यांच्या कार्याची महती विशद केली . तसेच या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन केले .यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या .
कार्यक्रमातस अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाशराव पाटील,केंद्रीय उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी,शहर अध्यक्ष देवेंद्र वाणी,प्रदेश संघटक रूपेश चौधरी, कोषाध्यक्ष प्रवीण पाटील,सोशल मिडिया प्रमुख शुभम पाटील,जयंत चौधरी बहिणाई ब्रिगेड च्या जिल्हा अध्यक्ष सौ स्वाती भोळे उपजिल्हा अध्यक्ष सौ नैना जावळे सौ मनिषा पाटील सौ मेघा कुरकुरे सौ भारती महाजन सौ कल्पना शिंदे सौ वैशाली पाटील सौ उज्वला पाटील सौ वैशाली चौधरी सौ संध्या भोळे आदिंची उपस्थिती होती


