भुसावळ विधानसभेच्या रिंगणात प्रमुख मातब्बरांसह 16 उमेदवार वैध -माघारीनंतर चित्र होणार स्पष्ट : 12 नामनिर्देशन पत्र ठरले अवैध

भुसावळ – विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांनी एकूण 33 अर्ज दाखल केले होते मात्र बुधवार, 30 रोजी छाननीत 21 नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून 12 नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याचे निवडणूक विभागाकडून कळवण्यात आले आहे तर नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या 16 झाली आहे.

भुसावळ विधानसभेच्या अनुसूचित जाती या राखीव प्रवर्गासाठी काल एकूण 22 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आज दि 30 रोजी छाननीअंती 16 उमेदवार पात्र ठरलेले असून आता यापैकी नेमके कोणकोणते उमेदवार माघारी घेणार याबाबत भुसावळ विधानसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये उत्सुकता लागलेली आहे.

पात्र झालेले उमेदवार खालील प्रमाणे

1) डॉ राजेश तुकाराम मानवतकर ( INC )
2) राहुल नारायण बनसोडे (BSP)
3) संजय वामन सावकारे (BJP)
4) जगन्नाथ देवराम सोनवणे ( VBA)
5) अजय जिवराम इंगळे (अपक्ष)
6) गौरव धनराज बाविस्कर (अपक्ष)
7) पुष्पा जगन सोनवणे (अपक्ष)
8) प्रशांत मनोहर तायडे (अपक्ष)
9) प्रवीण नाना सुरवाडे (अपक्ष )
10) प्रतिभा सुजित जगदाळे (अपक्ष )
11) भूपेश विश्राम बाविस्कर (अपक्ष)
12) रवींद्र बळीराम सपकाळे (अपक्ष)
13) शेख रहीम शेख अहमद (अपक्ष)
14) शैलेश प्रभाकर बोदडे (अपक्ष)
15) सुशील ज्ञानेश्वर मोरे (अपक्ष)
16) स्वाती श्रीकांत बाविस्कर (अपक्ष)

अपात्र उमेदवार यांची यादी खालीलप्रमाणे-

१) उज्वला गजानन चंदनकर
२) प्रिति तोरण महाजन ३) कीर्ती सुरेश वानखेडे ४) सुरेश वामन केदारे
५) अनुपकुमार प्रेमचंद मनुरे
६) रजनी संजय सावकारे वरील सर्व पात्र आणि अपात्र उमेदवार त्यांच्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती भुसावळ विधानसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी आज ३० ऑक्टोबर रोजी घोषित केलेले आहे.

. दरम्यान, प्रीती महाजन यांचे पती तोरण महाजन यांनी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले .