भुसावळ – मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे – संत्रागाची – पुणे उत्सव विशेष ट्रेन २ अतिरिक्त सेवांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहेतः
०१४२७ उत्सव विशेष पुणे येथून दिनांक ३०.१०.२०२४ रोजी २०.५० वाजता सुटेल आणि संत्रागाची येथे तिसऱ्या दिवशी ०७.३० वाजता पोहचेल. (१ सेवा)
०१४२८ उत्सव विशेष संत्रागाची येथून दिनांक ०१.११.२०२४ रोजी १८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०३.२० वाजता पोहचेल. (१ सेवा)
थांबे:- दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, अकोला, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगढ, झारसुगुडा, राउलकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर.
संरचना: १ तृतीय वातानुकूलित, १० स्लीपर क्लास (ज्यामध्ये २ आरक्षित आणि ८ अनारक्षित कोच), २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ५ द्वितीय श्रेणी.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
रेल्वे प्रशासनाकडून गैरसोय टाळण्यासाठी कृपया वैध तिकिटांसह प्रवास करा असे आवाहन करण्यात येत आहे.


