भुसावळ – भुसावळ रेल्वे मंडळात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय एकतेचा संदेश जन-जनापर्यंत पोहचवण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी ‘रन फॉर यूनिटी’ रॅली आयोजित करण्यात आली.यावेळीभुसावळ मंडळ रेल प्रबंधक (डीआरएम) श्रीमती इति पांडे यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांनी, कर्मचार्यांनी, स्काउट आणि गाइड, क्रीडा संघटन आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या रॅलीत भाग घेतला. ही रॅली भुसावळच्या डीआरएम कार्यालयापासून सुरू झाली आणि भुसावळ स्थानकाच्या उत्तर दिशेला समाप्त झाली.

भुसावळ मंडळ रेल प्रबंधक कार्यालयात दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी “राष्ट्रीय एकता दिवस” चा आयोजन करण्यात आला. या प्रसंगी मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पांडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचार्यांना राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी शपथ दिली.

या कार्यक्रमात अपर मंडळ रेल प्रबंधक प्रशासन सुनील कुमार सुमन, अपर मंडळ रेल प्रबंधक तांत्रिक लोक एम् के मीणा, तसेच सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याचे वचन दिले.
समारोहाचे संचालन सहायक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी केले.



