ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दिवाळी साजरी :

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा हार, दिव्यांच्या रोषणाईने तसेच रांगोळी टाकून सजवली.
यावेळी प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्त्व सांगितले.आणि जमिनीवर फटाके पेटवून दिव्यांचा सण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुख समृद्धीचा संदेश दिला. तसेच लहान मुलांनी फटाके फोडताना आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना आपल्या बाजूला उभे करून फटाके फोडायचे आहेत ,कोणीही मोठे फटाके फोडू नयेत अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तसेच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले,सोनाली मजुमदार,स्मिता जाधव,ऍनेट मॅथ्यू व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये दिवाळी फटाके फोडून साजरी करताना शिक्षक व विद्यार्थी वर्ग.