,
भुसावळ – दिनांक २५/१०/२०२४ रोजी उपविभागीय अधिकारी भुसावळ विधानसभा मतदार संघाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित आढावा बैठकीत उपस्थित बीएलओ यांना व्होटर स्लिप बाबत १००% वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे तसेच वयोवृद्ध मतदारांचे 100 वय असलेल्या मतदारांना होम वोटिंग ची सुविधा उपलब्ध करून देणे १२ ड फॉर्म, पोल डे इत्यादी बाबत सूचना दिल्या
बूथ लेवल असिस्टंट यांची वोटर स्लिप वाटपासाठी मदत घेणे बीएलओ यांनी मतदारांना नाव नंबर बूथ शोधण्यासाठी मदत करणे व्होटर स्लीप वाटताना पोच घेणे 85+ मतदार ,दिव्यांग , आक्षेप पंचनामा पेपर या सर्व बाबींची माहिती दिली .निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील आणि गटविकास अधिकारी डॉ सचिन पानझडे व निवडणूक आयोग तहसीलदार अंगद आसटकर उपस्थित होते
तसेच आज दिनांक २५/१०/२०२४ रोजी सकाळी ११. वाजता पोस्टल बॅलेट टीमची बैठकित श्रीमती प्रीती लूटे यांनी फॉर्म १२ आणि १२ अ बद्दल माहिती दिली



