भुसावळ :- शहरातील जळगांव रोडवरील हॉटेल स्वराज मध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढविणारे महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांची बैठक सुरू आहेत. सदरील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक क्रमांक १२ मध्ये एकूण १० उमेदवार हे बैठकीला तळ ठोकून आहे. नेमके कुठल्या उमेदवार पक्ष उमेदवारी देते याची प्रतिक्षा लागलेली आहे.
या बैठकीला जिल्ह्याध्यक्ष प्रदीप पवार व डॉ. जगदीश चौधरी (काँग्रेस पक्ष निरीक्षक) यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवार रवींद्र निकम, शैलेंद्र नन्नवरे, श्याम तायडे, प्रा. सद्यांनशीव सर, शैलेंद्र बोदडे, डॉ. स्वसुवर्णा गाडेकर, डॉ. राजेश मानवतकर, प्रिती महाजन,अँड. प्रवीण सुरवाडे, जितेंद्र चांगरे अशांची बैठक सुरू आहे. नेमके पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कुठल्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




