जळगाव – येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे नवरात्री उत्सव अष्टमीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी स्त्रियांचा बहुमान असलेली साडी चोळी, हळदी , कुंकू, खणा नारळाची ओटी भरण्याचा कार्यक्रम आज दिनांक 9/10/2024 बुधवार रोजी संपन्न झाला. यावेळी एकूण 25 महिलांची साडी चोळी, गजरा,खण नारळाने ओटी भरण्यात आली.
काहीं जुन्या समजुतींना दिला फाटा

केवळ सौभाग्यवती म्हणजेच शक्ती नव्हे तर गंगा भागीरथी,परित्यक्ता , यांना सुद्धा जगदंबेची पूजा करण्याचा हक्क आहे नवरात्र मध्ये स्त्री शक्तीचा जागर असतो. याच स्री शक्तीचा व मातृशक्तीचा जागर या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. हा कार्यक्रम नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
याप्रसंगी नारीशक्ती बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनीषा पाटील, एडवोकेट सीमा जाधव, नूतनतास खेडकर , श्रीमती ज्योती राणे,किमया पाटील, वंदना मंडावरे ,मंजुषा अडावदकर , हर्ष गुजराती, भारती कापडणे, विद्या जकातदार, या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.


