महिला पतंजली योग समितीच्यावतीने योगिनी योग वर्गामध्ये होमहवन :

भुसावळ – महिला पतंजली योग समिती भुसावळच्यावतीने दुर्गोस्तवानिमित्त नवरात्रीच्या पावन पर्वावर मंगळवार रोजी योगिनी योग वर्गामध्ये राज्य कार्यकारिणी सदस्य महानंदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होमहवनचा धार्मिकविधी करण्यात आले .

कार्यक्रमास भुसावळ मधील सर्व योग वर्ग सहभागी झाले होते सकाळच्या सुंदर अशा वातावरणामध्ये गायत्री मंत्राचे उच्चारण व धूप दिप , हवन सामुग्री यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते . प्रसंगी योग वर्गांमधील साधिका लता पाटील यांचा मुलगा अभिजित याचे वाढदिवसानिमित्त त्यांनी योग वर्गाला समई भेट दिली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक अंजली वाघमारे , वर्षा लोखंडे , मीना राजपूत , सुरेखा पाटील , हेमा चौधरी , पूनम साकला , सुमिती चौधरी , आरती खांडवेकर ,मीना डाके , मनीषा चौधरी , पुष्पांजली बोंडे , शारदा धांडे ,प्रतिभा पाटील , यांचेसह महिला पतंजली योग समिती भुसावळ वर्गातील साधिका यांनी परिश्रम घेतले .