भुसावळ – भुसावळ महिला क्रीडा मंडळातर्फे जि. प. प्राथमिक शाळा कन्हाळे, शाळेतील मुलामुलींसाठी सुरक्षेच्या दृष्टीने “ज्ञान स्पर्शाचे ” कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून “स्पर्श चांगला व वाईट” हे कसा ओळखायचे हे समजावून सांगून, मार्गदर्शनपर केले .

यावेळी मंडळाचे अध्यक्ष व समुपदेशिका आरती चौधरी यांनी मुला-मुलींना विश्वासात घेऊन जर वाईट प्रसंग आलाच तर काय करायचं कसं त्याला तोंड द्यायचं हे सांगितलं यासाठी छोट्या छोट्या गोष्टी विविध पद्धतीने उदाहरणा सहित सांगितले .उदारणार्थ ओरडणे, चावणे, तिथून सुरक्षित जागी पळून जाणे, स्वतःचं रक्षण करणे व जे घडलं ते कोणालातरी सांगणे हे महत्त्वाचं आहे, हे गोष्टी स्वरूपात सांगून तर काही गोष्टी प्रात्यक्षिके दाखवून समजावून सांगितले, त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
शिक्षीका सरला जावळे यांनी हा कार्यक्रम शाळेत अत्यंत उपयोगी ठरेल असे सांगून आभार व्यक्त केले.
या प्रसंगी क्रिडा मंडळाच्या उपाध्यक्ष स्वाती नाईक, किरण चौधरी व चारू महाजन उपस्थित होते.
तसेच कन्हाळे येथील सरपंच रजिया गवळी व मोहंमद गवळी
सौ मंगला राजपूत. मूख्याध्यापक रविंद्र मसाने..आणि सरला जावळे,कविता पाटील, वर्षा ठाकूर,फरिदाबनो , खगेश खाचणे आणि जकिर गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून सहकार्य केले. .


