जळगाव – गोमाता रक्षणार्थ सदैव अहोरात्र झटून गोमतेची अविरत सेवा करणारे भुसावळ येथील गोसेवक रोहित महाले यांना नुकताच जनमत प्रतिष्ठान हेमंत फाउंडेशन आयोजीत महाराष्ट्र ज्ञानवंत गुणवंत गुणगौरव पुरस्कार मध्ये गोसेवक रोहित महालेंचा समावेश
जिल्ह्यातील
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या यादीत शहरातील गोमाता सेवक रोहित महाले च्यां कार्याची दखल घेत दिनांक ६ रोजी अभिनव प्राथमिक विद्यालय जळगाव भाभा अनुसंधान नागपुर येथील संदीप नाले , जिल्ह्याचे महापौर सौ जयश्री महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले महालेनीं आपल्या संघर्षपुर्ण प्रवासात १९ वर्षाच्या कारकिर्दीत गोमातेबरोबरच असंख्य प्राण्यांचेही जीव वाचवित उल्लेखनीय कार्य केले तसेच हरविलेल्या बेवारस व्यक्तींना त्यांच्या घरच्यांचा शोध घेत भेटविले या पुरस्कारात मोमेन्ट सर्टिफिकेट व पुस्तक मिळाले यावेळी
सौ जयश्री महाजन यांनी दुसऱ्यासाठी जगणारे खरे जीवन जगत असतात असे सांगून महालेप्रती गौरवोद्गार व्यक्त केले यावेळी सत्कारार्थी रोहित महाले यांनी आयोजक पंकज नाले
व हेमंत भंगाळे सह मान्यवारांचे आभार मानत गोसेवेचे व्रत व सेवाकार्य अविरतपणे सुरुच राहणार असून , गोमातेचे रक्षणा साठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली .




