भुसावळ – येथील भुसावल कला, विज्ञान, आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील कला मंडळाच्यावतीने विविध ललित कला स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी ललित कला स्पर्धाचें उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटिल यांनी केले. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत कला मंडळ प्रमुख डॉ.आर.एस. नाडेकर, ललित कला समन्वयक प्रा. स्मिता बेंडाळे तसेच कला मंडळ सदस्य उपस्थित होते.
प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. विविध ललित कला प्रकारात रांगोळी, मेहंदी, क्ले मॉडलिंग, इन्स्टॉलेशन कोलाज, स्पॉट पेंटिंग, फोटोग्राफी, व्यंगचित्र इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बेटी बचाव, व्यसनाधीनता, पर्यावरण संवर्धन, राजकारण अशा ज्वलंत विषयांवर ही स्पर्धा संपन्न झाली.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. तसेच इतर प्राध्यापक बंधू भगिनी यांनी अनमोल सहकार्य केले. प्रा.डॉ.के.के.अहिरे, प्रा.डॉ.जे.एफ. पाटील,प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, डॉ. स्मिता चौधरी, डॉ.एस. टी. धूम, डॉ. विदया ए. पाटील, प्रा.डी. एन. पाटील, डॉ.एस. के. राठोड, डॉ. गौरी पाटील, डॉ.किरण वारके, डॉ. ममताबेन पाटील, डॉ . सचिन येवले, डॉ. व्ही.एन. महीरे, डॉ.मनोज जाधव, डॉ. उमेश फेगडे, डॉ. सचिन राजपूत, प्रा.पूनम महाजन, डॉ. सी.एस. सरोदे, प्रा. खिलेश पाटील, प्रा. स्वाती शेळके, प्रा. भूपेंद्र बानाईत, डॉ.गौतम भालेराव, प्रा. सचिन कोलते,श्री. विनीत पाटील, श्री. बापू वारके तसेच इतर प्राध्यापक बंधू भगिनी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे संपूर्ण व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील व उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे सर यांचे मार्गदर्शन लाभले.




