भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल शिव कॉलनीतील रहिवासी तथा बालरोग तज्ञ डॉ किरण पाटील हे मित्रासह त्यांच्या कारने मंगळवार १७ रोजी सकाळी जळगांव येथे जात असतांना गोजोरा गावाजवळ
त्यांच्या कारवर निल गाईने जोरदार हमला केल्याने झालेल्या अपघातात डॉ पाटिल व त्यांचे सहकारी बालबाल बचावल्याची घटना येथे घडली .
बालरोग तज्ञ डॉ किरण पाटील हे त्यांचे मित्र राम नारखेडे हे दोघे कार क्र MH 19 CF 2401 या कारने मंगळवार १७ रोजी सकाळी जळगांव येथे जात असतांना गोजोरा गावाजवळ
त्यांच्या कारवर निल गाईने जोरदार हमला केला हा अपघात इतका भयंकर होता यात कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला मात्र सुदैवाने कार मधील डॉ किरण पाटील व त्यांचे मित्र बालबाल बचावले.
या अपघातात कारचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले.
डॉ किरण पाटील हे सेवानिवृत्त बस डेपो मॅनेजर टी पी पाटील यांचे मोठे चिरंजीव आहे.



