राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे कोरोना बाबत जनजागृती ;विश्वशांतीसाठी प्रार्थना

भुसावळ (प्रतिनिधी )- जगभरात भीतीने थैमान घालणाऱ्या कोरोना या साथीच्या रोगाबद्दल भुसावळ शहरातील नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी यासाठी येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे राधेश्याम लाहोटी यांच्या नेतृत्वात विश्वशांती करिता प्रार्थना करण्यात आली .
स्थानिक राम मंदिर समोर प्रभातफेरीच्या वतीने सर्व विश्वात शांती राहावे , सर्व मानवासह प्राणिमात्रा यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो ,सर्वानी प्रेम भावनेने राहावे अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली . तसेच कोरोना या विषयी महत्वपूर्ण माहिती देवून जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाने दिलेले आदेशाचे नागरिकांनी व व्यापारी यांनी तंतोंतंत पालन करावे ,अफवांवर विश्वास ठेवू नका, जास्तीत जास्त सहजगता बाळगावी, न भीता एकमेकांना सहकार्य करुन कोरोना बाबत भीती नष्ट करा असा संकल्प करण्यात आला . यावेळी राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी , जे बी कोटेचा, संजय अग्रवाल , डॉ , देवेंद्र शर्मा , श्याम काबरा , अर्जुन पटेल , श्याम अग्रवाल , राजेश अग्रवाल , संजय फालक , राजेश चांडक , दिलीप टाक, आदीं उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *