जळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी योगेश ठाकूर – पदभार स्वीकारला : नूतन निरीक्षक स्मिता नवघरे यांनीही स्वीकरला पदभार

जळगाव : जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांची मुख्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी योगेश गंगाधर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी आपला पदभार स्वीकारला. दरम्यान, जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांचीदेखील नाशिक एसीबीत बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांनीदेखील पदभार स्वीकारला आहे. नवघरे या राज्य गुप्तवार्ता विभागातून बदलून आल्या आहेत.

अधिकार्‍यांना निरोप : नूतन अधिकार्‍यांचे स्वागत
जळगाव एसीबीतून बदली झालेल्या अधिकार्‍यांना सहकार्‍यांतर्फे सत्कार करून निरोप देण्यात आला तर नूतन पोलीस उपअधीक्षक व निरीक्षकांचे यावेळी कर्मचार्‍यांनी स्वागत केले.

तक्रारदारांनी निसंकोचपणे पुढे यावे : पोलीस उपअधीक्षक
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश गंगाधर ठाकूर म्हणाले की, एसीबीचा नुकताच पदभार स्वीकारला आहे. शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी वा नोकर स्वतः वा खाजगी पंटरांच्या माध्यमातून शासकीय कामे करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तक्रारदारांनी मनात कुठलीही भीती न बाळगता निसंकोचपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 किंवा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक 9702433131 तसेच लॅण्डलाईन क्रमांक 0257-2235477 तसेच टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.