भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे म्युनिसीपल हायस्कूलजवळ नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या व या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला. क्लब सदस्यांनी आपल्या घरातील जुन्या साड्यांच्या पिशव्या बनवण्यासाठी वापर केला. जवळपास 500 पिशव्या शिवून त्याचे नागरिकांना मोफत वाटप रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान करण्यात आले.
क्लबने प्लास्टिक पिशव्या, कॅरीबॅग टाळा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश दिला. परिसरातील व येणार्या जाणार्या नागरिकांनी या उपक्रमाची स्तुती केली. आमदार संजय सावकारे व भुसावळचे डी.वाय.एस.पी. कृष्णात पिंगळे उपस्थित होते. पुढील वर्षी हा उपक्रम आमचा क्लब आणखी जोमाने करेल, असा निर्धार प्रोजेक्ट चेअरमन अदिती भडंग यांनी बोलून दाखवला. या प्रोजेक्टसाठी अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, प्रोजेक्ट चेअरमन अदिती भडंग, संध्या वराडे, सुनीता पाचपांडे, कविता पाचपांडे, रंजना यावलकर, रेवती मांडे, अदिती पांडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.



