चांदवडच्या कर्तव्यदक्ष कन्यांचे कौतुकास्पद कार्य : ” स्वा. सावरकर युवा विकास मंच तर्फे ” कर्तव्यदक्ष नागरिक सन्मान पुरस्कार ” प्रदान :


चांदवड :- नाशिक जिल्हातील
चांदवड तालुका येथील बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधून देणा-या चांदवडच्या कर्तव्यदक्ष कन्या कुमारी काजल संदीप पवार आणि कुमारी सिद्धी ईश्वर बोटवे यांच्या आदर्शवत कार्याचा सन्मान स्वा. सावरकर युवा विकास मंच चांदवड यांचेतर्फे नुकताच ” कर्तव्यदक्ष नागरिक सन्मान पुरस्कार ” देवून सन्मानित करण्यात आले .

पुरस्कार देण्यासाठी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यासाठी स्वा. सावरकर युवा विकास मंच चांदवड. परिवारातर्फे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दोन्हीही कन्यांना ज्येष्ठांनी शुभाशीर्वाद दिले व मंच चे आधारस्तंभ संतोष शेठ पलोड व सुनिल कबाडे यांनी सन्मानचिन्ह , शाल श्रीफळ व भेट वस्तू प्रदान करण्यात आले.

यावेळी मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. या मुलींच्या कार्याचा परिसरातील सर्व नागरिकांतर्फे गौरव करण्यात येत आहे. याप्रसंगी मनोज बिरारी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले, सुनिल कबाडे यांनी उपस्थित बांधवांना संबोधित केले. बाळा पाडवी यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन केले. दरम्यान शहरातील प्रसिद्ध के मार्ट मॉल चे संचालक प्रभाकर शेठ क्षत्रिय व किशोर क्षत्रिय यांनी देखील भेट वस्तू देत या कर्तव्यदक्ष कन्यांचा सन्मान केला. या सन्मान सोहळ्यात चांदवड शहरातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती नोंदवली.