भुसावळ : विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील असावे जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होईल व त्यासाठी नेहमीच दक्ष असावे, असे आवाहन प्राचार्य रमेश जोशी यांनी येथे केले. भुसावळ शहरात श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 21 रोजी फॅकल्टी डेव्हलपमेंट ऑफ कॉमर्स व करियर काउंसलिंग सेलच्या माध्यमातून सीए, सीएस व युथ लीडरशिपविषयी एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
प्रमुख वक्ता म्हणून सीए मुकेश अग्रवाल, सीएस धर्मेंद्र मेंडके विनोद जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते. सीए मुकेश अग्रवाल यांनी सीएस कोर्सेस याविषयी मार्गदर्शन केले. धर्मेंद्र मेंडके यांनी युथ लीडरशिप याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व क्षमतेचे सृजन व्हावे यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा उल्लेख करत नेतृत्व क्षमता वाढवावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.अनुपम शर्मा तर आभार प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.पूनम त्रिवेदी, डॉ.सुधीर शर्मा यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय दिला.



