नाना पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कार जाहीर ;

भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना शंकर पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक- 2024 पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विविध सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक नवोपक्रम, उत्कृष्ट अध्यापन तसेच शाळा बाह्य विद्यार्थिनींना शिक्षण प्रवाहात आणणे . एका शाळाबाहय विद्यार्थिनीला वेळोवेळी मार्गदर्शन करून एकता दहावीला 75 टक्के च्या वर गुणवत्ता त्या विद्यार्थिनी प्राप्त केली आतापर्यंत सहा विद्यार्थिनींना शिक्षण प्रवाहात आणले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वाचन वाढावे यासाठी स्पर्धात्मक परीक्षा सहभाग वाढविणे विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांची उत्तम शैक्षणिक कामगिरी या आधारावर त्यांची निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरी करून संकल्प करण्यास लावणे वृक्ष संवर्धन संगोपन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे एक विद्यार्थी एक झाड उपक्रम राबविणे विद्यार्थी पालकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे असे विविध उपक्रम राबवित असल्यामुळे
कै.महेंद्र तिवारी फाऊंडेशन, झाशी, या संस्थेने मूलभूत शिक्षणाच्या शाळांमध्ये सकारात्मक कार्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक क्षितिजावरील ध्रुव तारेसारखे असणाऱ्या उत्कृष्ट अशा देशातील 51 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अचल सिंग यांनी सांगितले की, नाना पाटील सर यांना 25 ऑगस्ट रोजी शासकीय संग्रहालय, झाशी येथे नाविन्यपूर्ण शिक्षण आणि ई-कंटेंट तयार करण्यासाठी हा सन्मान मिळणार आहे. या कार्यक्रमाला आले ना दैनिक जागरण चे मुख्य संपादक श्री सुरेंद्र सिंह तसेच बेसिक शिक्षण विभाग उत्तर प्रदेश प्रकाशित प्रेरणा पत्रिका चे मुख्य संपादक डॉ . के बी त्रिवेदी यांच्या उपस्थितीत द बेस्ट टीचर अवॉर्ड दिला जाणार आहे असे स्वर्गीय महेंद्र तिवारी फाउंडेशन झाशी चे संचालक मृत्युंजय तिवारी साधना तिवारी डॉक्टर अचल सिंह यांनी कळविलेले आहे नाना पाटील यांना याआधीही विविध सामाजिक व आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत सन्मानित करण्यात आलेले आहे .