भुसावळात दावते इस्लामी हिंद तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न :

भुसावळमध्ये दावते इस्लामी हिंद जीएनआरएफतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भुसावळ – भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दावते इस्लामी हिंद भुसावळ या सामाजिक व धार्मिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये मुलांची तिरंगा रॅली, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचा समावेश होता.

सकाळी 10:30 वाजता अयान टॉवर ते अमरदीप चौक पासून मदरसतुल मदीनाच्या मुलांनी तिरंगा रॅली काढण्यात आली.या रॅलीत मुलांनी हातात तिरंगे झेंडे व वृक्ष घेऊन सर्वसामान्यांना देशभक्तीचा संदेशा सोबतच वृक्षरोपण करण्याचें संदेश दिला रॅलीच्या शेवटी रझा टॉवर मोहम्मद अली रोड खडका रोडवर मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व विश्वशांती भारताच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली यासोबतच दावत इस्लामीचे कल्याण विभागाच्या जीएनआरएफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सुन्नी जामा मशिदीजवळील जाम मोहल्ला येथे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत या शिबिराचे उद्घाटन भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी श्री वाघ यांनी GNRF टीमला भविष्यात देखील समाज आणि देशाच्या लोकांच्या कल्याणासाठी कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या या शिबिरात ५० पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले
दावत इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी, जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी, शहराध्यक्ष शोएब अत्तारी, साबीर मणियार, अझहर कादरी, सईद अत्तारी, युसूफ खान, हाजी शाकीर कादरी, खालिद अत्तारी, अब्दुल मतीन अत्तारी, हाफिज कासिम यांचा सहभाग होता.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कारी इद्रिस, कारी खालिद, हाफीज अकबर, मौलाना झुल्फकार मिसबाही, मौलाना साजिद हुसेन, फरीद शेख, अब्दुल वाहिद अत्तारी, दानिश कुरेशी, जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफिक रोशन कादरी यांनी प्रयत्न केले.