भडगाव (दि १० )-
भडगाव शाळेतील चिमुकल्या विदयार्थ्यांना निसर्गात नाचण्या खेळण्याचा आनंद मिळावा. तसेच केळीच्या पानावर गोडधोड खमंग जेवणाचा अस्वाद मिळावा. तसेच महादेवाचे दर्शन व्हावे. या भावनेने गोंडगाव प्राथमिक विदयालयातील शिक्षकांनी स्वखर्चातुन विदयार्थ्यांसाठी दर वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी बांबरुड प्र. ब. येथील विजय पाटील यांच्या शेतात निसर्गरम्य वातावरणात अन महादेव मंदिराजवळ हा विदयार्थ्यांसोबतचा हा स्तुत्य कार्यक्रम या पहील्याच श्रावण सोमवारी दि. ५ रोजी आनंदात साजरा करण्यात आला. या शिक्षकांच्या दातृत्वाचे अन उपक्रमाचे पालकवर्गासह नागरीकातुन स्वागत होत आहे.
याबाबत माहीती अशी कि, तालुक्यातील गोंडगाव येथील प्राथमिक शाळा असुन श्रावण सोमवार निमित्त विद्यार्थ्यांना शाळेतील उपशिक्षक नामदेव निंबा देवरे यांच्याकडून स्वखर्चातुन वनभोजन देण्यात आले. त्यासाठी गावातील उपशिक्षक विजय नगराज पाटील यांच्या गावा लगत असलेल्या शेतामध्ये महादेवाचे मंदिर असून त्या मंदिरात जवळ सर्व विद्यार्थ्यांना घेऊन तेथे विद्यार्थ्यांना महादेवाचे दर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आनंदासाठी वेगवेगळे गाणे गवळण तसेच लहान मुलांचे नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर शेतात केळीच्या पानांवर सुंदर असे भोजन विद्यार्थ्यांना देण्यात आले. प्रसंगी महादेवास आवडणारे नैवेद्य वरण-भात बट्टी देवडांगर ची भाजी शिरा विद्यार्थ्यांना देण्यात आला .विद्यार्थ्यांनी मनसोक्त जेवण केले .तसेच प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल नामदेव दाभाडे, माजी अध्यक्ष ललित मांडोळे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे दीपक फुलपगारे ,फारूक मण्यार व सर्व सदस्य तसेच गावातील शिव व्याख्याते दत्तु मांडोळे , वंदे मातरम गृपचे विजय साळुंखे , शशिकांत पाटील , संतोष वरथरे , पुरुषोत्तम पाटील , पञकार अशोक परदेशी, सामाजीक कार्यकर्ते रवींद्र सूर्यवंशी ( जयश्रीराम ), केंद्र शाळेचे मुख्याध्यापक दीपक राव निंबा बोरसे तसेच विजय नगराज पाटील , नितीन जगन्नाथ महाजन , निंबा नामदेव देवरे , ज्ञानेश्वर भालचंद्र पाटील, भिमराव कोळी, पिंटु दखनी तसेच महिला शिक्षिका निर्मला सोळंके , पुनम पवार , शर्मिला देसले , दलवाडे शाळेचे शिक्षक अहिरराव उपस्थित होते .शालेय परिसर स्वच्छ राहण्यासाठी परिसरात गवतावर तणनाशक मारणारे गावातील दादाभाऊ भदाणे , मोनटू पाटील , कैलास कोळी , सुदाम पाटील, अनिल आप्पा, अनिल टेलर त्यांचे सहकारी यांनी शाळेला मदत केली . व सर्व मदत ही विनामूल्य केली .अशा पद्धतीने कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला .तसेच ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले. या मंदिरावर दरवर्षी पहील्या श्रावण सोमवारी गोंडगाव शाळेचे शिक्षक व बांबरुड प्र. ब. येथील रहिवाशी विजय नगराज पाटील हे यापुर्वीपासुन आपल्या शाळेतील विदयार्थ्यांना आपल्या शेतात निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाच्या कार्यक्रमाचा स्वखर्चाने आयोजन करतात. असा बालकांसोबतचा शिक्षकांसह नागरीकांसोबत आनंद घेणार्या उपक्रमाचे सर्वञ अभिनंदन होत आहे

फोटो — वाडे बांबरुड प्र. ब.
रस्त्यावरील महादेवाचे मंदीराजवळ शाळेतील बालकांना वनभोजनाचा आनंद देतांना शिक्षक व नागरीक.


