जळगांव जिल्हा पूर्व वि. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळची निवडणूक बिनविरोध : तज्ञ संचालक पदि डॉ प्रदिप साखरे यांची निवड:

भुसावळ – जळगांव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळचे उपाध्यक्ष राजु बाबुलाल लवांडे, मा. चिटणीस विनोद विश्वनाथ पाटील तसेच खजिनदार . प्रशांत सुरेश सोनवणे यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी दि ०२.०८.२०२४ रोजी कार्यकारी मंडळाची पदाधिकारी निवडीची सभा अध्यासी अधिकारी एस.डी. उचित सहकारी अधिकारी, अधिन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, भुसावळ यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेत अश्विनी योगेश कोळी, भारत विदयालय न्हावी यांची उपाध्यक्ष पदासाठी श्री. गोपाळ रामकृष्ण महाजन, सार्वजनिक विदयालय, असोदा यांची चिटणीस पदासाठी तसेच . ज्ञानेश्वर तुकाराम मोझे यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला त्यानंतर मावळते पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सभेस अध्यक्ष जी. एन. पाटील, चिटणीस जी. आर. महाजन सी. अश्विनी. वाय. कोळी, डि. टी. मोझे, एन. आर. दोडके, . एस. पी. महाजन, व्ही. व्ही. पाटील, . सी. जे. तळेले, डि.जे.गुळवे, . पी. एस. सोनवणे, . ए. एस. परखड, श्री. टी. टी. सोनवणे, सौ. निलिमा. एच. नेमाडे, सौ. चेतना, जी, चौधरी, श्री. राजेश व्ही महाजन, श्री. प्रमोद. एस. पाटील हजर होते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे संस्थेचे जेष्ठ सभासद तथा जळगांव माध्य शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस. डी. भिरुड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष.. जे. के. पाटील जळगांव माध्य शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष जे.पी. सपकाळे, जळगांव माध्य शिक्षक पतपेढीचे सदस्य . डि. एच. पाटील, जळगांव माध्य शिक्षक पतपेढीचे सदस्य श्री. एस.एल. वाघुळदे, भुसावळ माध्य शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष श्री. डि. ए.पाटील, भुसावळ माध्य शिक्षक पतपेढीचे माजी . चिटणीस . वाय. एन. झोपे, संस्थेचे सभासद कैलास चौधरी, अजित पाटील व पतपेढीच्या अनेक सभासदांनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी स्वागत केले आहे तसेच पदाधिकारी निवडीनंतर संचालक मंडळाच्या सभेत प्रदिप.आर. साखरे यांची सन २०२४-२०२५ या वर्षासाठी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

फोटो

पतपेढीचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करतांना एस. डी. भिरुड, .डि.ए.पाटील .डि.एच. पाटील, जे पी सपकाळे संस्थेचे अध्यक्ष जी. एन. पाटील, सदस्य व सेस्थेचे सभासद