मुलींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये – डॉ. माया आर्वीकर

भुसावळ – आरोग्यम धनसंपदा या ब्रीदवाक्य नुसार मुलींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये कारण आपली पुढची पिढी ज्या कुशीत जन्म घेणार आहे, त्या आजच्या मुलींनी निरोगी असणे आवश्‍यक आहे हा विचार करून रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे वराडसीमच्या पंडीत नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थीनींचा मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला. यावेळी आरोग्य तपासणीसह मुलींनी स्वत:ची व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व करावी यावर डॉ. माया आर्वीकर यांनी मार्गदर्शन केले सुमारे 250 विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी करण्यात आली .

याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनंत पाटील, सेक्रेटरी आरती चौधरी, गजानन ठाकूर, डॉ. माया आर्वीकर, सारंग चौधरी, मदन बोरकर, महेश भराडे, संजय चापोरकर,मंगला पाटील, वैशाली पाटील प्रकाश ठाकूर उपस्थित होते.
या वेळी शाळेचे उपाध्यक्ष देविदास हिवरे, चेअरमन अरूण वाणी, सदस्य राजाराम धनपाल, सदस्य भास्कर सपकाळे, पर्यवेक्षिका मिनाक्षी फालक, उपशिक्षक संदिप भंगाळे, मनोहर झांबरे, प्रशांत ढाके, रीतेश भारंबे, शंकर साळुंके, निलेश राजपूत, प्रमोद नारखेडे, विकास तळेले.यांनी परीश्रम घेतले.
गोदावरी मेडिकल काॅलेजचे कृनेश गुप्ता, प्राची दहीया, शितल गावीत, अनिकेत गालफडे, प्रथमेश गव्हाळे, योगेश. गायकवाड, मृदुला मुंगसे यांनी परिश्रम घेतले . आरोग्य
तपासणी नंतर मुलींना शारीरिक स्वच्छता व आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मुलींनी निसंकोच पणे विचारलेल्या शंकाचे निरसण डॉ. माया आर्वीकर यांनी करून मार्गदर्शन केले.
ज्या मुलींना थायराॅईड, हिमोग्लोबीनची कमी, मासिक पाळीच्या तक्रारी होत्या त्यांना पुढील तपासणी साठी मार्गदर्शन केले तसेच ज्यांना व्हिटॅमीनची कमतरता होती त्यांना योग्य असा मौलिक सल्ला दिला .