भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील शिव काॅलनी परिसरामध्ये भाविकांच्या देणगीद्वारे उभारण्यात आलेल्या शिवशक्ती मंदिरात गुरूवार दि.१ ऑगष्ट राेजी प्राणप्रतिष्ठा साेहळा उत्साहात पार पडला.

दरम्यान शाेभा यात्रा दि. ३० राेजी सायं.४ वा.काढण्यात आली. तर दि.३१ राेजी श्री गजानन महाराज भजनी मंडळाने मंत्रमुग्ध भजनांचा कार्यक्रम सादर केला. शिवशक्ती महादेव व ईच्छापूर्ती श्री सिद्धीविनायक गणपती मुर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरूवार दि.१ राेजी स.८.३० ते १ वाजेपर्यंत यजमानांच्या हस्ते व ब्रम्हवृदांच्या वेदमंत्राेच्चारात झाली. तद्नंतर महाप्रसादाचा लाभ जामनेर राेडवरील शिव काॅलनी, दुर्गा काॅलनी, पंकज काॅलनी, पंढरीनाथ नगरातील भाविकांनी घेतला.



