जामनेर –
येथील तहसील कचेरी समोर आज सकाळी महाविकास आघाडी जामनेर तालुका च्या वतीने तालुक्यातील विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले कपाशीला बारा हजार रुपये हमीभाव द्यावे केळी ज्वारी मक्का या पिकाला हमीभाव मिळावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे केळी व इतर पिकाची पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी जामनेर शहरात अतिक्रमधारकांचे पूर्वसन व्हावे चेहरा सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावे जामनेर तालुक्यात बोकाळलेले अवैध धंदे सट्टा पत्ता गावठी दारू गांजा गुटखा विक्री त्वरित बंद करावे अशा अनेक विविध मागण्यांसाठी आज सकाळी दहा वाजता तहसील कचेरी समोर महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील संपर्क नेते डॉक्टर मनोहर पाटील तालुका अध्यक्ष किशोर पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत सरचिटणीस शरद पाटील शिवसेना (उद्धव

बाळासाहेब ठाकरे )गटाचे महाराष्ट्र राज्य संघटक राहुल चव्हाण जिल्हा उपसंघटक तथा पत्रकार गणेश दादा पांढरे तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी याप्रसंगी स्थानिक आमदार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मिधे सरकारवर आसूड ओढले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी अशोक चौधरी नंदू इंगळे दिलीप पाटील प्रल्हाद बोरसे माजी नगराध्यक्ष राजुशेठ बोहरा माजी नगरसेवक अनिल बोहरा दत्तू साबळे भास्कर पाटील पाटील सचिन बोरसे शिवसेना शहर प्रमुख ईसा शेख संघटक उस्मान शेख डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या सह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


