रावेर : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सहस्त्रलिंग गावातील तरुणाला दोन जिवंत काडतूस व गावठी कट्टा बाळगताना अटक केली. ही कारवाई रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी ढाब्यावर करण्यात आली. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. फैजपूर उपविभागीय कार्यालयासह रावेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाल-रावेर रस्त्यावरील पंजाबी ढाब्यावर आलेल्या इरफान नबाब तडवी (36, रा.सहस्त्रलिंग, ता.रावेर) याला अटक केली. संशयीताच्या अंग झडतीत गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, सुनील पाटील, हवालदार महेंद्र महाजन, अनिल इंगळे, गणेश मनुरे, जगदीश पाटील, कॉन्स्टेबल विशाल शिवाजी पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील, सचिन घुगे, समाधान ठाकूर यांच्या पथकाने केली.



