भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला दर वर्षी प्रमाणे यंदाही तिथीनुसार व परंपरेनुसार १२ मार्च (गुरूवार) रोजी शिवजयंती उत्सव समिती भुसावळच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात येत आहे.यासाठी शहरात सर्वत्र भगवे ध्वज व पताका लावण्यात आल्याने शहर भगवेमय झाले आहे तर शिवाजी महाराज यांच्या पुतळा सभोवतालचा परिसराला तटबंदी व बुरुज उभारण्यात येवून दरबारातील मंचाप्रमाणे स्वागत मंच उभारण्यात आला असून सर्वत्र विद्युतरोषणाई करण्यात आली आहे .
पूर्वसंध्येला जोरदार आतषबाजीत जन्मोस्तवाचा जल्लोष;
तर रात्री १२ वाजेला छत्रपती यांचे पुतळयास पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज की जय ..जय भवानी जय शिवाजी ‘गगन भेदी घोषणा करीत फटाक्यांची आतषबाजी करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी समिती अध्यक्ष राखूंडे,युवराज लोणारी , योगेश बागुल , मुकेश गुंजाळ, नमा शर्मा , यांचेसह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व मावळे मोठ्या संख्यने उपस्थित होते .
दुग्धाभिषेक व विधिवत पूजन
१२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता टिंबर मार्केट येथील छत्रपतीं शिवरायांच्या अर्धाकृती पुतळयास दुग्धाभिषेक व महाअभिषेक करून विधिवत पूजा अर्चना करण्यात येणार आहे . तर दुपारी १२ वाजता रेल्वे स्टेशन परिसरात शितपेय व अन्नदान वाटप, दुपारी ४ वाजता मिरवणुकीस प्रारंभ ,यावेळी शहरातील विविध भागांमधुन येणाऱ्या सहभागी प्रत्येक मिरवणूकीच्या अध्यक्ष व कार्यकर्ते यांना सन्मानचिन्ह ,शाल व श्रीफळ देवून गौरविन्यात येणार आहे .
सर्व शिवप्रेमी जनतेने सहकुटुंब सहपरिवार या मिरवणुकीत सामील होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी
असे आवाहन समितीच्या पदधिकाऱ्यांनी केले .
शिवजयंती उत्साहात व आनंदाने साजरी करा – डिवायएसपी गजानन राठोड
दरम्यान कायदयाचे काटेकोर पालन करून शिवजयंती उत्साहात व आनंदाने साजरी करा असे आवाहन डिवायएसपी गजानन राठोड यांनी केले .
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (तिथिनुसार ) निमित्त येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला सायंकाळी बैठक संपन्न झाली .सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस या रोगाचे भितीमुळे खबरदारी म्हणून १२ रोजी सकाळी काढण्यात येणारी दुचाकी रॅली समितीने रद्द करून पोलिस प्रशासनास सहकार्य केले आहे .
यावेळी उपविभागीय पोलीस अधिक्षक गजानन राठोड , पोलीस निरक्षक दिलीप भागवत , पोनी बाबासाहेब ठोंबे आदी उपस्थित होते . प्रसंगी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा तसेच मिरवणुकी मध्ये सहभागी शिवमंडळ पदाधिकारी व शिवप्रेमी तसेच कार्यकर्ते यांना
शिवजयंती मिरवणूक वेळेवर काढून १० वाजेच्या आत संपवावी . कुणीही मद्यप्राशन करुन मिरवणुकीत ग़ैरवर्तन करु नका .शांततेत व उत्साहात मिरवणूक काढावी व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डिवायएसपी राठोड यांनी उपस्थितांना करीत कायद्या व सुव्यवस्था बाबत महत्वपूर्ण सूचना देवून कायदयाचे काटेकोरपणे पालन करावे असेही पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले . बैठकीस उत्सव समिती पदाधिकाऱ्यांसह विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते . यशस्वितेकरीता बाजारपेठ पोलिस कर्मचारी नंदू सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .


