राखेने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने तरुणाचा मृत्यू

वरणगाव, भुसावळ तालुक्यातील वल्हाळे येथील राखेच्या बंडात राख वाहणारे ट्रॅक्टर उलटून त्याखाली दाबल्या गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, औष्णीक विज केंद्रातून कोळशीची जळालेली राख विल्हाळे बंडात जमा झालेली राख विट भट्टी व इतर कामासाठी वापरली जात असल्याने राखेची मोठ्या प्रमाणात बंडातून ट्रॅक्टर व इतर वाहनाने वाहतूक केली जाते. बंडात जाणारा रस्ता मोठा जिकरीचा असल्याने वाहन चालकांना त्या रस्त्यावर चांगलीच कसरत करून राखेची वाहतूक करावी लागते. याच रस्त्यावर किरकोळ अपघात नित्याचे झाले आहे.

अशा जीवघेण्या रस्त्यावर मध्यप्रदेश येथुन मजुरीसाठी आलेला व सध्या विल्हाळे येथे स्थायिक असलेला विशाल तारसिंग तलोले (भिलाला) वय पंधरा ते अठरा वर्षाचा तरुण हा दि १७ बुधवार रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान टॅक्ट्रर घेऊन राख भरण्यासाठी जात असताना अचानक टॅक्ट्ररसह ट्रॉली उलथल्याने विशाल त्या खाली दाबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बी एन एन एस १९४ प्रमाणे अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील सह पो निरिक्षक श्रावण जवरे हे करीत आहे.