पर्यावरणासाठी सर्वांनी झाडे लावा
आर एफ ओ सौ प्रणाली धरमाळे ;

प्रत्येकाने एक एक वृक्ष लावून वृक्ष संवर्धनाचे वारकरी बना!!
नाना पाटील सर
भुसावळ
दि17 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भुसावळ येथील एस टी बस आगारात आगाराचे व्यवस्थापक राकेश शिवदे व एस.टी स्थानक प्रमुख पी बी भोई यांनी वृक्षारोपण केले .यावेळी आयोजित कार्यक्रमात भुसावळ नगरपरिषदेचे ब्रॅन्ड अम्बेंसेडर व पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष नाना पाटील सर हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की , आषाढी एकादशीला वारकरी एक एक करून मोठे संघटन करत जस जसे पुढे जातात तसतसे वारी चे संघटन करत वारी चे भविष्यासाठी संवर्धन ही केले जात आहे ही परंपरा चालत राहावी हे वारकरी ज्या प्रकारे करतात त्या प्रमाणे आपण एक एक वारकरी बनत वृक्षारोपन करू या आणि संघटन करत वृक्षसंवर्धन करत वृक्ष वारकरी बनूया . वृक्ष समुदाय झाल्यावर सर्वांना त्याचा फायदा होईलच विठूराया प्रमानेच वृक्ष सर्वांना मायेची सावली देतील . यासाठी आपण वृक्ष लावून वृक्ष वारकरी बना असे त्यांनी सांगितले .
यानंतर भुसावळ मुक्ताईनगर व रावेरच्या आर एफ ओ सौ प्रणाली धरमाळे योनी ही आषाढी एकादशी च्या शुभेच्छा देऊन सर्व नागरिकांनी वृक्ष लावा व संवर्धन करा व आपणास काही सहकार्य लागल्यास नक्की सहकार्य करेल . पर्यावरण जागर चे नाना पाटील सर यांच्या संकल्पनेनुसार सर्वांनी मिळून भुसावळ शहर हरीत शहर स्वच्छ शहर बनवूया असे आवाहन त्यांनी केले .
वृक्षारोपणाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल रुखमाई यांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांच्यासह सर्वांनी जवळ जवळ 125 वृक्षारोपन केले . यावेळी ही आषाढी एकादशी वृक्ष लावून केली ही आठवण सर्व कर्मचारी यांनाही रहावी म्हणून आज वृक्षारोपन केले यासाठी भुसावळ नगरपरिषदेचे सहकार्य लाभले . पी बी भोई यांनी सर्वाचे आभार मानले कार्यकमाला सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले .






